आमच्याविषयी:-

शिवछत्रपतींच्या पदस्पर्श्याने पावन झालेल्या तसेच सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या पुण्य नगरीमधील तमाम मिसळ प्रेमी खवय्या साठी सादर करत आहोत,चमचमीत ,झणझणीत ,लज्जतदार व पारंपरिक पद्धतीने बनवलेली “सह्याद्री मिसळ”.शिवछत्रपतींचा ,सह्याद्रीचा व पारंपरिकतेचा वारसा सांगत असताना आम्ही मिसळ पण पारंपरिक पद्धतीने बनवतो . आमच्या कडे मिसळ साठी लागणारे सर्व मसाले आम्ही घरगुती पद्धतीनेच बनवतो . मिसळ साठी खासकरून बारीक गावरान मोड आलेलीच मटकी वापरली जाते तसेच सर्वोउत्कृष्ट गुणवत्तेचा चिवडा, पापडी , शेव इत्यादी समप्रमाणात वापरूनच रुचकर ,चवदार ,स्वादिष्ट ,खमंग मिसळ बनवली जाते . आरोग्य पूर्ण जीवनशैलीसाठी आवश्यक असणाऱ्या पितळीच्या भांड्यात मिसळ बनवली जाते . तसेच मिसळ खाण्यासाठी सुद्धा पितळीचा वडगा (Bowl) वापरला जातो त्यामुळे पितळी मधील शरीराला गरजेचे असणारे घटक मिळतात. मिसळी साठी फक्त आणि फक्त शुद्ध शेंगदाणा तेलाचाच वापर केला जातो . मिसळीसाठी मऊ , लुसलुशीत पाव आमच्याकडील खास तयार केलेला मसाला वापरूनच तुपात खरपूस भाजून दिले जातात . कुठलेही कृत्रिम रंग तसेच टेस्टिंग पावडर न वापरता आम्ही नैसर्गिक पद्धतीनेच तयार केलेलीच मिसळ मिसळप्रेमी खवय्यांसाठी सर्वे केली जाते . प्रत्येक मिसळ प्रेमीच्या मागणीनुसार मिसळ म्हटले की तिखट, चमचमीत ,तरीदार ,झणझणीत असली पाहिजे त्यासाठी आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या १० पेक्षा जास्त प्रकारच्या मिसळ उपलब्ध आहेत . मिसळ ,दही मिसळ ,स्मोकी मिसळ,ब्राउनब्रेड मिसळ ,पनीर मिसळ ,काजू मिसळ,चीज मिसळ,सुखी मिसळ,छोटा भीम मिसळ ,मिल मिसळ इत्यादी मिसळ आपल्या सेवेत हजार आहेत .

गॅलरी

Contact us

Branch 1:
Ishana Building, 5 infront of Royal Enfield, Paud Rd,
Bhusari Colony showro, Pune, Maharashtra
411038
Contact: +91- 8668 722 733

Branch 2:
Tarankit Bldg,Opp.Bank of Maharashtra Lbs Road,
Ganjave Chowk, Navi Peth, Pune, Maharashtra 411030
Contact: +91 – 98230 44007